Categories: Featured सामाजिक

कोल्हापूरी बाबाचा ‘कोरोना मंत्र’, संकट पळवून लावण्याचा सांगितला उपाय, व्हीडीओ व्हायरल!

मुंबई। जगभरातील वैद्यकीय क्षेत्राला आव्हान ठरलेल्या कोविड १९ विषाणूला पळवून लावण्याचा कोल्हापूरातील ‘बाबा’ने उपाय सांगितला असून त्यानी आद्यशक्तीला जागृत करून तिच्यासमोर गाऱ्हाणे घालण्याची विनंती केली आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना आव्हान देणाऱ्या कोरोना विषाणूच्या आजारावर ‘सुधीर बाखरे’ नामक या बाबाने सांगितलेला उपाय लोकांची दिशाभूल करणारा असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

डिव्होशनल थेअरी फॉर कोरोना.. लेटस् ट्राय या नावाखाली सुधीर बाखरे यानी नारायनी ज्योतिष्यालय या युट्यूब चॅनेलवरून एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये सदर ज्योतिष्य बाबाने देशहितासाठी आणि समाजहितासाठी हे काम करण्याचे आवाहन त्यानी समस्त नागरिकांना केले आहे. यासाठी उद्यापासून होणाऱ्या चैत्र शुध्द प्रतिपदा ते नवमी, या चैत्र नवरात्रीत आपआपल्या घरी विशेषकरून पुरोहितांनी देखील यात सहभागी घेऊन राष्ट्रहितासाठी ठराविक वेळेत श्री दुर्गा स्पतशतीचा पाठ करावा असा उपाय सुचवला आहे. हा पाठ पल्लवीत किंवा संपुटित असा करावा असेही त्यानी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. यासाठी बाखरेनी काही मंत्र देखील सांगितले असून किमान १०० पाठ करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर हे प्रमाण सिध्द असून जगावर आलेलं संकट दूर होणार असल्याचा दावा केला आहे. 

ज्यांना पाठ करता येत नाही त्यांनी घरी बसून ९ दिवस १०८ किंवा १००८ वेळा सत्वशील आणि आर्त भावनेनं म्हणावा, असेही आवाहन बाखरेनी केले आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या वेळी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये रूद्रपाठ करताना पाहिल्याचं म्हणटलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी शांतीपाठ देखील सुरू असल्याचा दावा केला आहे. 

एकीकडे संपूर्ण जग युध्दपातळीवर कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यात गुंतलेले असताना अशा काही बाबांकडून मात्र दुकानगिरी सुरू असल्याने लोकांमध्ये अंधश्रध्दा पसरत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेणे गरजेचे आहे.  

Team Lokshahi News