Categories: राजकीय

सहकार पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह संस्थापक पॅनल मध्ये प्रवेश

कराड/ प्रतिनिधी : दुशेरे ता. कराड गावच्या ग्रामपंचायत सदस्या नीलम सचिन पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह संस्थापक पॅनल मध्ये प्रवेश केला. सहकार पॅनेलचे प्रमुख उमेदवार कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

सचिन पाटील हे देखील माजी ग्रामपंचायत सदस्य असून गाव पातळीवर त्यांचा व्यक्तिगत मोठा गट आहे. दुशेरे ता. कराड येथे संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यकर्त्यांसह संस्थापक पॅनल मध्ये प्रवेश केला आहे. दुशेरे व परिसरातून त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते संस्थापक पॅनेलमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे सहकार पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.

Tushar Gaikwad