Categories: ब्लॉग

संस्थापक पॅनेलच्या नावे ‘गेटकेन’च्या मुद्यावरून केला जाणारा अपप्रचार पूर्णतः चुकीचा!

कराड : ‘गेटकेन’ म्हणजे काय? तर विविध साखर कारखाने इतर साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस आपल्या साखर कारखान्यात गाळपास आणतात. ज्या शेतकऱ्यांचा ऊस अशा पध्दतीने गाळपास आणला जातो, ते शेतकरी ऊस गाळपास दिलेल्या कारखान्याचे ‘सभासद’ (अधिकृत सदस्य) नसतात. अशा प्रकारे स्वतःच्या कार्यक्षेत्रातील ऊसाव्यतिरीक्त दुसऱ्या भागातून सभासद नसलेल्या शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करुन आपल्या कारखान्यात गळीत करण्यास आणलेल्या ऊसाला ‘गेटकेन’ म्हणतात.राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यात काही प्रथा परंपरा सुरु असतात. त्याच पध्दतीने संस्थापक पॅनेल सत्तेवर येण्या अगोदरपासूनच य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यातही गेटकेन गाळपास आणण्याची प्रथा सुरु होती. कोणतीही प्रथा अचानकपणे बंद करण्याआधी त्याचा सखोल अभ्यास, त्यामागील अर्थकारण लक्षात घेवून मग ती प्रथा बंद करायची की, त्यामध्ये काही दुरुस्त्या करुन सुधारणा करायची हा निर्णय संचालक मंडळाच्या सल्ला-मसलतीने संस्थापक पॅनेलचे चेअरमन अविनाश दादा घ्यायचे. उपलब्ध आकडेवारीनुसार सन १९९९-२००० च्या गळीत हंगामापासून कृष्णेत गाळपास आणलेल्या गेटकेनची आकडेवारी इथे दिलीय. संस्थापक पॅनेलने सभासद हितासाठी २०१२-१३ पासून गेटकेन बंद केला.सन २०१० साली प्रथमच सत्तेवर आलेल्या नवख्या संस्थापक पॅनेलने २०१२-१३ च्या गळीत हंगामापासून कृष्णेत गेटकेन बंद केला. फक्त बंद केला नाही, तर ‘गेटकेन गाळपास आणणे हि आमची चूक होती’ अशी जाहीर कबुली सभासदांसमोर सन २०२० च्या महिला दिनी नेर्ले गावात संस्थापक पॅनेलने घेतलेल्या शेतकरी सभासद मेळाव्यात संस्थापक पॅनेलचे माजी चेअरमन अविनाश मोहिते दादा यांनी कबुली देत दिलगीरी व्यक्त केली.या मेळाव्यात अविनाश दादा म्हटलेले की, ‘मी सत्तेवर असताना नवख्या संचालक मंडळाला घेवून कारखाना चालवला. सुरुवातील गेटकेन आणण्याची चूक आमच्याकडून झाली पण २०१२-१३ नंतरच्या गळीत हंगामात आम्ही गेटकेनचे टिपरुकसुद्धा आणले नाही.’ आपल्या हातून झालेल्या चुकांची प्रांजळपणे कबुली द्यायला मनाचा मोठेपणा लागतो. नैतिकता लागते! जी अविनाश दादांजवळ आहे!!तरीदेखील राजकीय वैफल्यग्रस्त विरोधक संस्थापक पॅनेलने सन २०१२-१३ च्या गळीत हंगामानंतरही गेटकेन आणल्याचा अपप्रचार करत आहेत. या अपप्रचाराला कृष्णेचे सभासद येत्या २९ जून रोजी मतपेटीतून उत्तर देतील.

Tushar Gaikwad