Categories: Featured आरोग्य सामाजिक

मिरजेतील लॅबमुळे कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यातील कोरोनाचे अहवाल लवकर मिळणार – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

हातकणंगले। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये स्वॅब चाचणीची सोय झाल्याने सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील कोरोना संशयीतांच्या चाचण्या वेगाने होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याविषयी माहिती दिली आहे.

यापुर्वी कोरोना संशयीत बाधीतांच्या स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येत होते. पुणे येथे पाठविण्यात आलेल्या स्वॅबचे अहवाल उशिरा प्राप्त होत होते. मात्र मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये स्वॅब चाचणीची सोय झाल्याने आता सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील कोरोना संशयीतांच्या चाचण्या वेगाने होण्यास मदत होणार असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून कोरोना बाधीत संशयीतांचे स्वॅब चाचणीची लॅब सुरु झाली आहे. आज कोल्हापूर येथील संशयित २४ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून याचे अहवाल लवकरच मिळतील, अशी माहितीही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corona news kolhapur corona test lab in miraj kolhapur corona news