Categories: कृषी

PM किसान योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर आत्ताच करा ‘हे’ काम

नवी दिल्ली |सध्याच्या घडीला पीएम किसान योनजेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत केली जाते. साडेचौदा कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आलेल्या या योजनेत अद्याप अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पीएम किसान योजनेत अर्ज भरून देखील त्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत. या संदर्भात, पीएम किसान योजनेतील अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का येत नाहीत याची काही कारणे समोर आली आहेत.

  • शेतकऱ्याच्या नावाच्या अक्षरांमध्ये असणाऱ्या चुका –  यामध्ये आधार कार्ड आणि भरलेल्या अर्जातील नावात तफावत असणे. बॅंक पासबुकवरील नाव, आधार कार्डवरील नाव आणि अर्जातील नाव यात किरकोळ चुका असणे. अनेक लाभार्थी आपले आधार कार्ड बँकेच्या खात्यासोबत लिंक करत नाहीत यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत. शेतकऱ्यांचे खाते ग्रामीण बॅंका, सहकारी पतसंस्था यासारख्या ठिकाणी असते, त्याचा नंबर अर्जात भरला जातो. त्यामुळे खात्यात पैसे येत नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंक यातील खाते क्रमांक आयएफएसी कोड सह द्यावा. अर्ज भरताना आपला आधार कार्ड, बँकेचा खातेक्रमांक व्यवस्थित नोंदवावा. या व्यतिरिक्त काही चुका असतील तर कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा.

पीएम किसान योजनेत आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी – 
पीएम किसान योजनेत आपल्या अर्जाची स्थिती पाहायची असेल किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे तपासायचे असेल तर, आपण घरबसल्या ऑनलाईन अर्जाची स्थिती चेक करु शकता. त्यासाठी आपल्याला पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. याठिकाणी जाऊन आपण आपल्या खात्याचा तपशील तपासू शकता.

आधार कार्ड कसे करणार अपडेट 
PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यातील फार्मर कॉर्नरच्या Edit Aadhaar Details पर्यायावर क्लिक करावे. येथे आपला आधार क्रमांक नोंदवावा. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करावे.

योजनेत नाव नोंदवले नसल्यास घरबसल्या खालील लिंकवर जाऊन करा नाव नोंदणी –
योजनेत अद्याप नोंदणीच केली नसल्यास शेतकऱ्यांना आवश्यक माहितीसह घरबसल्याच आपले नाव या योजनेत नोंदवता येणे शक्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावरील New Farmer Registration वर क्लिक करावे. आणि आधार कार्ड, मोबाईल नंबर, बॅंक खाते क्रमांक यांच्या डिटेलसह माहिती भरून सबमिट करावी.

असा येतो आपल्या खात्यात प्रधानमंत्री किसान योजनेचा पैसा –
पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता हा १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान येत असतो. दुसरा हप्ता हा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान येतो. आणि आर्थिक वर्षातील तिसरा हप्ता हा १ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. योजनेमध्ये देशभरातील कोट्यावधी शेतकरी सामील असल्याने एकाच दिवशी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जात नाहीत तर तीन महिन्याच्या कालावधीत हे पैसे हस्तांतरण केले जातात. सर्व पैसा हा थेट हस्तांतरणाव्दारे (DBT) शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचवला जातो. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 24000 rupees pm kisan 6000 RUPEES PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance Kisan credit card KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM kisan penssion scheme PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान क्रेडीट कार्ड किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान मानधन योजना पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना