Categories: कृषी प्रशासकीय

जमीन NA (एनए) करण्याची प्रक्रिया माहित आहे का? जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत

सध्या विकासासाठी, राहण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर  जागेची मागणी वाढत आहे. परंतु शेतजमिनीत या गोष्टी करता येत नाहीत. त्यासाठी शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल (एनए) करावे लागते. अनेक सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहित नसते. तर काहींना ती माहित असली तरी त्याचे पूर्ण ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे एनए करण्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय आहे, ती कशी करावी लागते हे पाहणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्र जमीन महसूल ( कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९६९  नुसार  शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच  विकास कामाकरिता करता येत नाही. तो करायचा असेल तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.

एनए करण्यासाठी  आवश्यक असणारी कागदपत्रे
१) जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्यावर कोर्टाचा ५ रुपयांचा स्टॅम्प लावावा. 
२)  जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्याचा ४ झेरॉक्स.
३)  जमिनीचा फेरफार उतारा.
४)  जर जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर महसूल अधिकारी (तलाठी किंवा तहसीलदार) यांच्याकडून  जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे.
५) जमिनीचा ८ अ चा  उतारा.
६) तालुका भूमी अभिलेख रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला जमिनीचा नकाशा.
७) जर इमारतीसाठी एनए करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनच्या ८ प्रती.
८) जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आड येत  नसल्याची खातरजमा करण्यासाठी चालू  ७\१२ उतारा.
९)  जमीन राज्य महामार्ग, राष्ट्रीय  महामार्ग, जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र
१०) ग्रामीण भागात ग्राम पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र, शहरी भागात महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र.
११) जमीन बॉंम्बे वहिवाट आणि शेती कायदा १९४८ अंतर्गत असेल तर एनएसाठी परवानगी ४३/६३ नुसार मिळेल.
१२) एन करण्यात येणाऱ्या जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सेवा सोसायटीचे कोणतेही कर्ज किंवा भरणा नसल्याचा दाखला
१३) जमीन एनए करायची आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठ्याचे पत्र

जमिनीचे एनए करताना सरकारकडे भरावा लागणारा नजराणा – 
(जमीनीची बाजारभावानुसार किंमत ही जमीन अधिग्रहण कायद्यात ठरवलेली आहे)
एनए झालेली जमीनाचा त्या -त्या कामासाठी  उपयोग झाला  नाही तर तर तिचा एनए  म्हणून नोंद  रद्द होते आणि तुम्ही  भरलेला नजराणा  सरकार जमा होतो. 
१) शेत जमिनीचे रहिवासी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर रेडी रेकनर (सरकारने ठरवलेला भाव) नुसार जमिनीच्या ५०% रक्कम भरावी लागते.
२) शेतजमिनीचे व्यवसायिक जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या ७५%  रक्कम भरावी लागते
३) शेत जमिनीचे निम-सरकारी जागेत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या २०% रक्कम भरावी लागते
४) रहिवासी एनएचे औद्योगिकमध्ये रूपांतर करायचे असल्यास जमिनीच्या किमतीच्या २०% रक्कम भरावी लागते


एनए अर्ज कुठे आणि कसा करावा
१) एनए साठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा
२) अर्ज मिळाल्यावर जिल्हाधिकारी ७ दिवसात तहसिलदाराना तुमचा अर्ज पाठवतात.
३) तहसिलदार या अर्जाची छाननी करून अर्जदार व्यक्तीच जमिनीचा मालक आहे कि नाही याची खात्री करतात, तलाठ्यांकडून जमिनीची चौकशी करून घेतात.
५) तहसिलदार, जमीन एनए केल्यास कोणत्याही पर्यावरणीय अडचणी किंवा कोणत्या प्रकल्पास धोका पोहचणार नाही याची पडताळणी करतात
६) ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रूपांतरांचा आदेश काढतात.
७) जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन रूपांतरणाचा आदेश काढल्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची ‘एनए’ नोंद केली जाते

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Farm Land Purchase Rules Gunthewari Certificate Land Acquisition Land Purchase and Sale Business Land Purchase Information Non-Agricultural (NA) License Non-Agricultural Permit Application Village Land Purchase अकृषिक (एन.ए.) परवाना गावठाण जमीन खरेदी गुंठेवारी प्रमाणपत्र जमीन अकृषिक करणे जमीन खरेदी विक्री माहिती जमीन खरेदी विक्री व्यवसाय बिगर शेती परवानगी अर्ज शेत जमीन खरेदी नियम