Categories: राजकीय

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या रक्ताने पत्र हा समरजित घाटगेंचा राजकीय स्टंट?

कोल्हापूर। राजकीय स्टंट करण्याच्या नादात, स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या रक्ताने पत्र लिहून कोणी शेतकऱ्यांचा अपमान करू नये अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर केलीय. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ‘फडणवीस सरकारच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा दोन महिन्यांतच शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. ‘मी पालकमंत्री असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात २ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ टक्के शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहे. त्यांना अनुदान मिळावे ही अपेक्षा आहे. मात्र, आपला शेतकरी स्वाभिमानी आहे. तो शासनाला कर्जमाफीबाबत रक्ताने पत्र लिहिणार नाही. त्यामुळे कोणी राजकीय स्टंट करून शेतकऱ्यांचा अपमान करू नये असा टोला मुश्रीफांनी लगावलाय. 

सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकर्‍यांच्याच पत्राद्वारे थेट राज्यपालांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न नुकताच भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या हाताने लिहिलेली पत्रे राज्यपालांकडे त्यांनी सुपूर्द केली होती. यातील ३ शेतकऱ्यांनी रक्ताने पत्र लिहिली होती. यावरूनच मुश्रीफ यांनी समरजीत घाटगेंवर निशाणा साधलाय. मुश्रीफांनी केलेल्या या टिकेवरून कागलच्या राजकारणात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगणार आहे. यावर घाटगे काय प्रतिक्रिया देणार हे आता पहावे लागणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Hasan Mushrif mushrif Samarjeet ghatage महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्ज माफी यादी महात्मा फुले कर्ज माफी योजना