Categories: अर्थ/उद्योग

LIC च्या 2 नव्या योजना लाँच, जाणून घ्या कशी कराल फायदेशीर गुंतवणूक

मुंबई। जमीन आणि सोने खरेदीनंतर पैशाच्या गुंतवणुकीसाठी लोक LIC च्या पॉलिसीचाही मोठ्या प्रमाणात विचार करतात. LIC च्या योजनांमध्ये गुंतवणूक करून भविष्याची तजवीज अनेकांकडून केली जाते. त्यामुळे  LIC देखील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना आणताना दिसते. आज आम्ही LIC च्या अशा योजनेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो. सध्या LIC SIIP या योजनेमध्ये गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं मानलं जात आहे.

एलआयसीचे चेअरमन एमआर कुमार यांनी नुकतेच दोन नवीन यूनिट-लिंक्ड प्लॅन- एलआयसी निवेश प्लस प्लॅन (UIN 512L317V01) आणि एलआयसी SIIP (UIN 512L334V01) प्लॅन लाँच केले आहेत. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ९० दिवस तर जास्तीत जास्त ६५ वर्षे आहे.

 • एलआयसी निवेश प्लस
  • एलआयसी निवेश प्लस सिंगल प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि व्यक्तिगत जीवन विमा आहे, ज्यामध्ये पॉलिसी सुरु असताना विम्याबरोबरच गुंतवणुकीचा सुद्धा पर्याय मिळतो.
  • योजना घेणारा सिंगल प्रीमियम रक्कम निवडू शकतो.
  • पॉलिसी घेणारा किती पैसे जमा करणार आहे, हे ठरवू शकतो
  • पॉलिसी घेताना त्याच्याकडे बेसिक सम अश्युअर्ड निवडण्याची सुविधा देखील आहे.-
  • या दोन्ही योजना ऑफलाइन तसेच ऑनलाइन खरेदी करू शकता.
  • 02 मार्च 2020 पासून खरेदी करण्यासाठी ही योजना उपलब्ध आहे.
 • एलआयसी SIIP
  • एलआयसी SIIP एक नियमित प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि व्यक्तिगत जीवन विमा आहे, ज्यामध्ये पॉलिसी सुरु असताना विम्याबरोबरच गुंतवणुकीचा सुद्धा पर्याय मिळतो.
  • पॉलिसी घेणारे त्यांना भरायची प्रीमियम रक्कम निवडू शकतात.
  • किमान प्रीमियम 40,000 रुपये (वार्षिक) तर जास्तीत जास्त प्रीमियमसाठी मर्यादा नाही
  • पॉलिसी पूर्ण झाल्यावर युनिट फंडाच्या मूल्याइतकी रक्कम दिली जाईल.
  • पॉलिसीची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या अटींनुसार त्यातून काही पैसेही काढता येतात.
 • या पॉलिसींच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपल्या नजीकच्या LIC ऑफिसशी संपर्क साधावा, अथवा LIC च्या अधिकृत एजंटकडून माहिती घ्यावी.
Team Lokshahi News