मुंबई | विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहे. गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये हे सर्व आमदार असून या आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं आहे. आता थोड्याच वेळात एकनाथ शिंदे सुरत मधून पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शिंदे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजीनाट्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १२ ते १५ आमदार नॉट रिचेबल होते. ते गुजरातमध्ये असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना या आमदारांशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली असून शिवसेनेचे आणखी नऊ आमदार गुजरातला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.


सुरतला पोहचलेल्या शिवसेना आमदारांची यादी

१. एकनाथ शिंदे – कोपरी
२. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद
३. शंभुराज देसाई – पाटण, साताराट
४. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद
५. उदयसिंह राजपूत – कन्नड, औरंगाबाद
६. भरत गोगावले – महाड, रायगड
७. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला
८.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली
९.विश्ननाथ भोईर – कल्याण पश्चिम
१०. संजय गायकवाड – बुलडाणा
११. संजय रायमूलकर – मेहकर
१२. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा
१३. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर
१४. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर
१५ संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ
१६. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद
१७. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद
१८. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
१९. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद
२०. श्रीनिवास वनगा, पालघर
२१. राजकुमार पटेल, अपक्ष
२२. प्रदीप जैस्वाल