Categories: Featured आरोग्य गुन्हे सामाजिक

लॉकडाऊनच उल्लंघन करणाऱ्यानो सावधान; ३४६ जणांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.

शहर वाहतूक शाखेने १०७, इचलकरंजी शहर वाहतूक शाखा-७२, जुना राजवाडा ४, लक्ष्मीपुरी ७,  शाहूपुरी ५, राजारामपुरी ७, करवीर १७, कागल ५, मुरगूड २०, गांधीनगर १०, गोकुळशिरगाव १४, इस्पुर्ली ३, राधानगरी २, हातकणंगले ६,  भुदरगड ५६, गडहिंग्लज ११ अशा एकूण ३४६  केसेस नोंदवल्या आहेत. बोरपाडळे येथे हॉटेल शिवप्रसाद धाब्याच्या पाठीमागील भिंतीलगत अवैधरित्या दारु विक्री करणोर अभिजीत पांडुरंग ठाणेकर,  रा. झुलपेवाडी ता. आजरा (सध्या राहणार नावली ता. पन्हाळा) यांच्याकडे देशी टँगो पंच नावाच्या ३५ बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून  आल्या. त्याच्यावर कोडोली पोलीस ठाणे येथे मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५(ख) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर भा.द.वि. कायदा कलम १८८ प्रमाणे पन्हाळा पोलीस ठोणे येथे १ व इचलकरंजी पोलीस ठोणे येथे १  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आदेशाचे जिल्ह्यातील नागरिकांनी उल्लंघन करु नये. होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीनी घराबाहेर पडू नये  असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Abhinav Deshmukh Corona conflict Kolhapur News latest news latest news marathi Maharashtra News Maharashtra Today Maharashtra today news Marathi Batmya Marathi Breaking News Marathi News Marathi News Portal news maharashtra News Marathi News Today डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक