नवी दिल्ली। देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या (Lockdown Extension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. (Lockdown 5.0 Rules Regulation)
या गाईडलाईननुसार कंटेन्मेंट झोनच्या बाहेर केंद्र सरकारकडून शिथीलता देण्यात आली आहे. येत्या १ जूनपासून ३० जूनपर्यंत या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सला अनलॉक १.० असे नाव देण्यात आले आहे. या गाईडलाईन्स नुसार प्रत्येकाला मास्क वापराची सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये (Lockdown 5.0 Rules Regulation) अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाॅटेल, रेस्टाॅरंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या ८ जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नव्या गाईड लाईन्स काय?
राजकीय, सांस्कृतिक तसंच कोणत्याही स्वरुपाच्या कार्यक्रमाला परवानी देण्यात आलेली नाही. दुसऱ्या टप्प्यात शाळा-महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास हे सुरू करण्याबाबत राज्य सरकारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.