Categories: नोकरी शिक्षण/करिअर

पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन; ‘या’ ठिकाणी करा नोंदणी

कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ आणि २० ऑक्टोबर असे दोन दिवस हे ऑनलाईन जॉब फेअर घेतले जाणार आहे. याबाबतची माहिती, विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सं.कृ.माळी यांनी दिली आहे.

या मेळाव्यामध्ये विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांच्या विविध रिक्तपदांवर ही भरती केली जाणार आहे. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या  उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रमांक ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्ट व्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. इच्छुक युवक-युवतींनी दि. १९ ते २० ऑक्टोबर पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा  दूरध्वनी क्रमांक 0231-2690645 वर संपर्क साधावा.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: B.com Job Employment 2020 Employment news government job Graduation Jobs iti job Job fair Nokari Post Graduation jobs Rojgar Varta sarkars nokari Shivaji University Recruitment