Categories: Featured

वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने घेतले मेल्याचे सोंग; पहा भंडारा जिल्ह्यातील व्हायरल व्हीडीओ

भंडारा। सोशल मीडियावर सध्या पळ काढणाऱ्या एका वाघाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु हा पळ काढणारा वाघ आधी एका तरूणाच्या अंगावर बसलेला दिसत आहे. वाघाच्या तावडीतून या तरूणाने मोठ्या शिताफीने आपली सुटका करून घेतली असून त्याने लढवलेल्या नामी युक्तीमुळे आज हा तरूण जिवंत असल्याचे पहायला मिळत आहे. 

वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी या तरुणाने चक्क मृत्यूचे सोंग घेत आपला जीव वाचवला आहे. हा व्हिडिओ भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी गावातील आहे. वाघाच्या या हल्ल्यात ३ जण जखमी झाले आहेत. या व्हिडिओमध्ये वाघ तरुणाच्या अंगावर बसलेला दिसत आहे. परंतु, या तरुणाने मृत्यूचे नाटक केल्याने वाघाने आपली शिकार मेल्याचा ग्रह करून तिथून पळ काढलाय. वाघाला पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी याठिकाणी गर्दी केली होती.

काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या पथकाने वाघाला पळवून लावले होते. पंरतु, मागील आठवड्यात गावकऱ्यांना पुन्हा वाघाचे दर्शन झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी गर्दी करून वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, या हल्ल्यात ३ जण गंभीर जखमी झालेत. छोटेलाल ठाकरे, शंकरलाल तुरकर आणि विजय शहारे अशी जखमींची नावे आहेत. वाघाच्या हल्ल्यामुळे बिनाखी गावातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Bhandara Bhandara news Binakhi save the tiger Tiger tiger viral video Tumsar