मुंबई | राज्यातील कृषी पंप अर्जदारांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजना राबविण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून रुपये 2,248 कोटी (346 दशलक्ष युएस डॉलर) इतके कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
दि. ३१ मार्च,२०१८ अखेर पैसे भरून वीज जोडणीकरिता प्रलंबित असलेल्या राज्यातील सर्व कृषीपंप अर्जदारांकरिता उच्चदाब वितरण प्रणाली योजना राज्यात महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत विहित नमुन्यात केंद्र शासन / राज्य शासन व महावितरण कंपनीमार्फत अनुषंगिक करार करण्यात येणार आहेत.
•ग्रामीण भागातील लाखो कुटुंबियांना दारिद्र्य रेषेवर आणणाऱ्या नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला गती देणार. 523 कोटी रुपये निधी उभारणार. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत सहाय्य
•महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे कुलगुरु व प्र-कुलगुरु या वैधानिक पदावर नियुक्त अधिका-यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर ७ व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय.
•कृषीपंप शेतकऱ्यांना दिलासा. उच्चदाब वितरण प्रणाली योजना (HVDS) राबविण्यासाठी एशिएन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ( आदरातिथ्य) परवान्यांची संख्या कमी करून ईझ ऑफ डुइंग बिझिनेसची प्रभावी अंमलबजावणी