Categories: बातम्या राजकीय

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे कमळ रूसले..!

  • फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही – खडसेंचा भाजपवर हल्लाबोल
  • पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय
  • मराठवाडा, पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून नागपूरमध्ये काँग्रेसने विजयाचा दावा केलाय.

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला धोबीपछाड मिळाल्याने इथली जागा गमावावी लागली आहे. शिवाय औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. 

शिक्षक मतदारसंघात पुण्याची जागा काँग्रेसने तर अमरावतीची जागा अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी जिंकली. केवळ धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी बाजी मारली. हीच भाजपसाठी एकमेव सकारात्मक बाब ठरली आहे. 

या सर्व मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झाले होते. 

Team Lokshahi News