Categories: बातम्या

SSC Result 2021 : दहावीचा निकाल पहा घरबसल्या ‘या’वेबसाईटसवर; राज्याचा निकाल 99.95 टक्के

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल 99.95 टक्के, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे.

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल आज (16 जुलै) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

एकूण आठ माध्यमांतर्गत 2020-21 वर्षातील एसएससी परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 इतकी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन 2021 मध्ये इ. 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केले जातील.

या ठिकाणी पहाता येणार निकाल
दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
http://result.mh-ssc.ac.in
http://mahahsscboard.in
या संकेतस्थळांवर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
एसएमएस वापरुन विद्यार्थी त्यांचा दहावीचा दहावीचा निकाल तपासू शकतात. त्यांना फक्त निर्दिष्ट नमुन्यात एसएमएस टाइप करण्याची आवश्यकता आहे : MH<EXAM NAME><SEAT NO.> आणि पाठवा 57766

निकाल कसा पाहाल ? (How to Check Maharashtra SSC Result 2021)
* निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
* त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
* या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
* त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
* यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
* निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

असं असेल दहावीच्या निकालाचं सूत्र 
दहावीचा निकाल लावताना नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
A. विद्यार्थ्यांचे इ 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – 30 गुण
B. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – 20 गुण
C. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी च्या अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Maharashtra ssc result mahresult nic in 2021 mahresult ssc result 2021 online ssc result sms ssc result ssc result 2021 date ssc result 2021 maharashtra board official website ssc result roll number wise sscresult.mkcl.org 2021