ST संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा?

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंंत्री अनिल परब यांनी दिले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल असे परब म्हणाले.

रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना काल एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली. तर आज कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना सामावून घेण्याचे सपष्ट संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.