Categories: बातम्या राजकीय

सेना – भाजप पुन्हा एकत्र येणार या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातील गुप्त भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध आडाखे बांधले जात आहेत. 

दरम्यान, आज सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. याबाबत टीव्ही ९ ने बातमी दिली आहे. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नाही. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए…अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है” त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे या प्रश्न आहे. मात्र आजच्या बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे.

किसी भी रिश्ते को कितनी भी
ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए…
अगर
नज़रों में इज़्ज़त और बोलने में
लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है…— Sanjay Raut (@rautsanjay61) September 25, 2020

Lokshahi News