Categories: Featured

महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक तरतूदी

 • नियमित परतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रन अनुदान देणार
 • २ लाखापेक्षा जास्त पीककर्ज असणा-यांसाठी सर्व कर्ज धरुन २ लाखाचं कर्ज माफ करणार
 • १० हजार ३५ कोटी जलसंपदा विभागासाठी निधी, राज्यातील भूजल पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न
 • ऊसासह इतर पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान
 • केंद्राकडून GST परताव्यास विलंबामुळे विकासकामांना अडथळा
 • जलयुक्त शिवारऐवजी ठाकरे सरकारची मुख्यमंत्री जलसंधारण योजना
 • प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिस्तरीय समिती गठीत करण्यात येऊन तिच्या शिफारशींचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे करणार
 • १०७४ ग्रामपंचायतींसाठी एक हजार कोटींचा निधी, २०२४ पर्यंत नवीन कार्यालयीन इमारती
 • महाराष्ट्रातील रस्ते विकासासाठी १२०० कोटी मंजूर
 • आरोग्य विभागासाठी ५ हजार कोटींची तरतूद
 • शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल
 • महिला बचतगट चळवळ – १ हजार कोटींची शासकीय खरेदी बचतगटांकडून करणार
 • शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींची तरतूद, एक लाख थाळींचे उद्धिष्ट
 • कोकणच्या विकासासाठी सरकारचं प्राधान्य, कोकणातील रस्त्यांचा विकास करण्यावर सरकारचा भर
 • राज्यातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार
 • सामाजिक न्याय विभागासाठी ९,६६८ कोटींची भरीव तरतूद
 • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. दरवर्षी दीड ते दोन लाख रोजगार निर्मिती
 • ग्रामीण भागातील ४० हजार किमीची रस्त्याची कामे हातात घेऊन ती पूर्ण करण्याचे नियोजन
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: budget 2020 lokshahi.news mahavikas aaghadi budget महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्ज माफी यादी महात्मा फुले कर्ज माफी योजना लोकशाही.न्यूज