Categories: Featured

महाविकास आघाडी सरकार: २८ व २९ फेब्रुवारीचे महत्वाचे निर्णय

२९ फेब्रुवारी २०२० महाविकास आघाडी सरकारचे महत्वाचे निर्णय

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत मुंबईमेट्रो मालिका३ मधील कामांची पाहणी.
 • उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत, लायन ताराचंद बापा हॉस्पिटलचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम संपन्न.
 • बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी परम बीर सिंह यांची नियुक्ती.
 • मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची, सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्यासोबत बैठक, मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा, समितीचे सदस्य नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित.
 • तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश. जनता दरबारच्या धर्तीवर होणार आयोजन.
 • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर.

२८ फेब्रुवारी २०२० महाविकास आघाडी सरकारचे महत्वाचे निर्णय

 • भविष्यकालीन कृषी धोरणांवर नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत कृषी मंत्री श्री.दादाजी भुसे यांची चर्चा.
 • या शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी वीज जोडणीचे अर्ज केले असतील ते पूर्ण करण्यासाठी कमी उच्चदाबाच्या वाहिनीवरुन देण्याबाबत प्रयत्न केले जातील, अशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभेत माहिती
 • न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांच्या अध्यक्षतेखालील व्यापारी शिष्टमंडळाद्वारे राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट.
 • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमानांच्या लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिनांक १८ एप्रिल २०२० पर्यंतच्या कालावधीसाठी जारी.
 • दहशतवादी तसेच राष्ट्रविरोधी घटकांकडून कोणत्याही प्रकारे हवाई आक्रमण किंवा अन्य प्रकारे सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी दिनांक २४ मार्च २०२० पर्यंत बृहन्मुंबई हवाई क्षेत्र अतिलघु विमाने, ड्रोन आदींसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.
 • विद्यार्थ्यांनी बनविलेल्या रोबोटिक्स आणि वैज्ञानिक प्रतिकृतींच्या फिरत्या प्रदर्शनाचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन.
 • पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे उपस्थित.
 • वाढवण बंदराबाबत सर्वांची बाजू विचारात घेऊन निर्णय घेण्याचे ठाकरे यांचे सूतोवाच.
 • नागरिक आणि प्रशासनासाठी उपयुक्त असलेली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ निर्मितडिरेक्टरी २०२०चे माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन.
 • धुळे महिला रुग्णालयाला निधी उपलब्ध करून देणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती.
 • केंद्र शासनाचे निकष आणि समितीच्या शिफारसीनुसार ट्रॉमा केअर सेंटर्सना मंजुरी देण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती.
 • आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी एशीयन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून निधी देण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
 • आरोग्य विभागात विशेषज्ञांची ५७४ पदे तीन महिन्यात भरण्याची आणि राज्यातील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती .
 • लोकसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना समर्पितशब्दसृष्टीया हिंदीमराठी द्विभाषिक त्रैमासिक पत्रिकेच्या विशेषांकचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन.
 • आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय गरीब ऊसतोड व वीटभट्टी महिला मजूर यांना शेळीपालन प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्याकरिता आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय मजुरांसाठी शेळीपालन व्यवसाय स्वतंत्र योजना राबविण्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे यांचे सूतोवाच.
 • उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत जे निर्देश दिले आहेत, त्या दृष्टीने यावर्षीचे शैक्षणिक प्रवेश सुरु होण्यापूर्वी कायदा करून त्यांची अंमलजबजावणी करण्याची, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची विधानपरिषदेत माहिती.
 • प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन.
 • अनुदानास पात्र घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळ/वर्ग तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरु असल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत माहिती.
 • माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे एखाद्या शाळेतील शिक्षकाचे पद वाढत असल्यास, असे वाढीव पद अटींच्या अधिन राहून अतिरिक्त शिक्षकासह त्या शाळेला उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षण संचालकांना कळविले असल्याची शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. नरीमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे सीएनबीसी टीव्ही १८ इंडियातर्फे आयोजित, इंडियन बिजनेस लिडर ॲवार्ड कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रालास्टेट ऑफ द इयरपुरस्कार प्रदान, उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांच्याद्वारे पुरस्काराचा स्वीकार. पर्यटन, पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित.
 • सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याद्वारे विधानसभेत देण्यात आलेली माहिती –  वनक्षेत्रांतर्गत पोलिसांच्या गृहसंस्थांसाठी ८५० कोटी निधी उपलब्ध करून देणार, धोकादायक असलेल्या इमारती निष्कासित करणार, संबंधित कामासाठी कंत्राटदारांची निवड करताना अटी व नियमांचे कठोर पालन करणार, अपूर्णावस्थेत असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत बंद असलेली कामे प्राधान्याने सुरु करणार, कोकणातील कोस्टल रोड प्रामुख्याने पूर्ण करणार, रेतीचे घाट असतील तेथील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार, व्हीजिलन्स आणि क्वालिटी कंट्रोल यावर कटाक्षाने लक्ष देणार, माहिम कॉजवेचे स्ट्रक्चरल ऑडीट करून प्राधान्याने हे काम पूर्ण करणार.
 • तेलंगणा शासनाने हैदराबाद येथील मराठी महाविद्यालयास सन २०१९२० या शैक्षणिक वर्षासाठी अनुदानित हा दर्जा बदलून स्वयंअर्थसहाय्यित दर्जा दिला आहे. या संदर्भात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घेणार असल्याची, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. हैदराबाद येथील मराठी महाविद्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्राची सर्वोतोपरी मदत
 • अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी अकोला शहरातील सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भानुप्रताप मडावी आणि प्रणिता कराडे यांना निलंबित आणि पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आल्याची, गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत घोषणा.
 • नाशिक विभागातील कळवण आगाराच्या बसला झालेल्या अपघातातील एस.टी.बसच्या प्रवाशांना दहा लाख रुपयांची आणि ऑटोरिक्षातील प्रवाशांना दोन लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून देण्याची, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा.
 • मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्गला सुरू करणार असल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती. उपकेंद्रासाठी स्वतंत्र संचालक येत्या दोन महिन्यात नेमणार.
 • धुळे शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात १०० खाटांच्या महिला रुग्णालयासाठी निधीची तरतूद करण्याची, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत घोषणा.
 • शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी नवीन आजारांचा समावेश करण्याचा निर्णय, आता हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट यांचा समावेश करण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची विधानसभेत घोषणा, या उपचारांपूर्वी २५ टक्के रक्कम कमाल मर्यादेच्या अधीन राहून अग्रीम मंजूर करण्यासाठी मान्यता, उपचारांच्या कमाल मर्यादा : यकृत, हृदय, फुप्फुस प्रतिरोपण प्रत्येकी १५ लाख रुपये, हृदय व फुप्फुस प्रतिरोपण (एकत्र) २० लाख रुपये. बोन मॅरो ट्रान्सप्लांट ८ लाख रुपये. कॉक्लिअर इम्प्लांट ६ लाख रुपये.
 • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, अर्थसहाय्य प्राप्त मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी बैठक. सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित, मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे मुंडे यांचे सूतोवाच.
 • इतर मागासवर्गीयांची जनगणना होण्यासाठी राज्याने आग्रह धरला पाहिजे, यासाठी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घ्यावी किंवा आवश्यकता वाटल्यास तामिळनाडुच्या धर्तीवर राज्यातओबीसींची जनगणना करण्यात यावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे राज्य शासनाला निर्देश.
 • नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्फत आढावा, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याणमंत्री श्विजय वडेट्टीवार उपस्थित.
 • जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते दिल्लीत प्रधानमंत्री यांची भेट घेणार असल्याची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा.
 • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शालेय पोषण आहारासंदर्भात बैठक, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी उपस्थित.
 • महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारातमहानंदच्या टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करण्याचे पवार यांचे निर्देश.
 • लोकसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना समर्पितशब्दसृष्टीया हिंदीमराठी द्विभाषिक त्रैमासिक पत्रिकेच्या विशेषांकाचे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन.
 • वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, सोलापूरच्या वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध अडचणींबाबत बैठक, या वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सुधारणा करण्याबरोबरच व्हेंटिलेटर्सची संख्या वाढविण्याचे देशमुख यांचे निर्देश.
Team Lokshahi News