Categories: कृषी

शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर, यादीत ‘इतक्या’ शेतकऱ्यांचा आहे समावेश

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. तर उर्वरित शेतकऱ्यांची यादी २८ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही यादी जाहीर करण्यात आली असून महाविकास आघाडी सरकारने आपला दिलेला शब्द पाळण्यास सुरवात केल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. (Mahatma Jotirao Phule Farmer Loan waiver First list)

शेतकरी कर्जमुक्तीसाठी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. तर १ लाख ६१ हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे. आज प्रकाशित झालेल्या यादीत ६८ गावांमधील १५ हजार ३६८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.  यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांचा समावेश आहे. ४५०० जणांना आधार प्रमाणपत्र देण्यात आलं असून २४ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आज ६८ गावांमधील १५ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 

कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले आणि हेरले या दोन गावातील नावांची यादी आज प्राथमिक टप्प्यावर जाहीर झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत आसुर्ले इथं हे काम सुरु आहे. जिल्ह्यातील ५०
हजार ६१८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपलब्ध होतील.

KOLHAPUR_Panhala_Asurle_VKList_1_2020-02-24

KOLHAPUR_Hatkanangle_Herle_VKList_1_2020-02-24

अहमदनगर
९७२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ब्राह्मणी (ता. राहुरी) गावातील ८५६, तर जखणगाव (ता. नगर) मधील ११६ शेतकऱ्यांची नावं या यादीत समाविष्ठ आहेत. 

उस्मानाबाद

तामलवाडी आणि पाथरूड या दोन गावातील ३१२ शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी जाहीर केली आहे.

हिंगोली

आजच्या यादीत २३६ शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या गावातील शेतकऱ्यांचा यात समावेश असून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या गावांना भेट दिली आहे.

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: crop insurance farm insurance farmer loan waiver first list of announced Insurance Mahatma jotirao phule farmer loan waiver scheme 2020 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकरी कर्जमाफी