Categories: महिला सामाजिक

सुकन्या समृध्दी योजनेच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या काय मिळणार लाभ..!

नवी दिल्ली | मुलींच्या सुरक्षित भविष्याचा विचार करून मोदी सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृध्दी योजनेत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात आले आहेत. सरकारने नवीन खाते उघडण्याच्या नियमात सूट दिली आहे. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच २५ मार्च ते ३० जून या काळात ज्या मुलींचे वय १० वर्षे पूर्ण झाले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना किंवा त्यांच्या आईवडिलांना या मुलींचे खाते उघडता आलेले नाही, अशा वयाची १० वर्षे पूर्ण केलेल्या मुलींना खाते उघडता येणार आहे. नियमात देण्यात आलेली ही सूट ३१ जुलै पर्यंत लागू राहणार आहे.

सुकन्या समुद्धी योजना ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेतून सध्या ७.६ टक्के व्याज मिळत आहे. योजनेत खाते उघडताना व्याजदर असतो, त्याच प्रमाणे आपल्या गुंतवणूकीवर व्याज आकारले जाते. सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्यासह सर्व अल्प बचत योजनेतील गुंतवणुकीवर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या व्याजदरात बदल केलेला नाही. सुकन्या समृध्दी योजनेत एका आर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. तर एका आर्थिक वर्षात कमीत कमी २५० रुपयांची गुंतवणुक करावी लागते. तसेच या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला आयकरापासूनही सुटका मिळते. योजनेतील व्याज आणि मुद्दल रक्कम पण टॅक्स फ्री असते.

या योजनेत पालकांना १४ वर्ष गुंतवणुक करावी लागते. त्यानंतर २१ व्या वर्षी हे खाते मॅच्युअर होते. या दरम्यानच्या ७ वर्षाच्या कालावधीत १४ वर्षात जमा झालेल्या एकूण रक्कमेवर ७.६ टक्के दराने व्याज दिले जाते.आणि २१ वर्षानंतर मॅच्युरिटीची पूर्ण रक्कम दिली जाते. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Best car insurance Business Insurance buy online insurance farmer insurance get insurance health care insurance India news insurance against loan Insurance quotes latest news loan for house online insurance POMIS RBI BANK SBI Bank SBI BANK INSURANCE sbi bank loan SBI Insurance sudden death insurance पोस्ट ऑफिस RD पोस्ट ऑफिस इंटरेस्ट रेट्स टेबल पोस्ट ऑफिस चाइल्ड प्लान पोस्ट ऑफिस डबल मनी स्कीम पोस्ट ऑफिस भविष्य निधि योजना पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम 2020 पोस्ट ऑफिस योजना 2019 पोस्ट ऑफिस स्कीम 2019 प्रधानमंत्री बचत योजना भारत सरकार योजना भारतीय डाक की नई स्कीम वरिष्ठ नागरिकों के लिए डाकघर मासिक आय योजना सबसे अच्छी बचत योजना सबी मंथली इनकम स्कीम कैलकुलेटर सुकन्या समृध्दी योजना