मुंबई | ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून ‘राज्य पाणी व स्वच्छता मिशन’ राबविण्याच्या अनुषंगाने बोधचिन्ह तयार करण्यासाठी, राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त कलाकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्य पाणी व स्वच्छता मिशन अभियानाच्या संचालक आर. विमला यांनी केले आहे. स्पर्धेतील विजयी उमेदवारांना ५० हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे.
स्पर्धेची नियमावली –
१. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संपूर्ण माहिती उदा. नाव, पत्ता , संपर्क क्रमांक इ . असणे आवश्यक आहे.
२. स्पर्धकांनी तयार केलेले लोगो व ब्रीदवाक्य ३० सप्टेंबरपर्यंत directorwsso@gmail.com आणि iccwsso@gmail.com या मेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे.
३. या स्पर्धेत व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील.
३. ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छता या विषयांचा सहज बोध होईल, अशा पध्दतीने लोगो करण्यात यावा.
४. बोधचिन्हाचे ब्रीदवाक्य हे मराठीतच असणे बंधनकारक आहे.
५. बोधचिन्ह एकरंगी, बहुरंगी प्रकारात असले तरी चालेल.