मुंबई | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (MHADA) सरळ सेवा भरती-2021 अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 6 व 7 जून 2022 या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे. यादी खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करावे.
कागदपत्र पडताळणी यादी – https://bit.ly/3LMh8nP

कागदपत्रे पडताळणीचा तपशील
सोमवार, ६ जून
पहिले सत्र : सकाळी १० वाजता

 • -कार्यकारी अभियंता संवर्ग- सूचीतील १ ते १० क्रमांकांचे उमेदवार
 • -उपअभियंता संवर्ग- सूचीतील १ ते १४ क्रमांकांचे उमेदवार
 • -सहायक अभियंता संवर्ग- सूचीतील १ ते २४ क्रमांकांचे उमेदवार
 • -कनिष्ठ अभियंता संवर्ग- सूचीतील १ ते ७५ क्रमांकांचे उमेदवार

दुसरे सत्र : दुपारी २ वाजता

 • -कार्यकारी अभियंता संवर्ग- सूचीतील ११ ते २० क्रमांकांचे उमेदवार
 • -उपअभियंता संवर्ग- सूचीतील १५ ते २७ क्रमांकांचे उमेदवार
 • -सहायक अभियंता संवर्ग- सूचीतील २५ ते ४८ क्रमांकांचे उमेदवार
 • -कनिष्ठ अभियंता संवर्ग- सूचीतील ७६ ते १५० क्रमांकांचे उमेदवार

मंगळवार, ७ जून
पहिले सत्र : सकाळी १० वाजता

 • -कार्यकारी अभियंता संवर्ग- सूचीतील २१ ते ३० क्रमांकांचे उमेदवार
 • -उपअभियंता संवर्ग- सूचीतील २८ ते ४१ क्रमांकांचे उमेदवार
 • -सहायक अभियंता संवर्ग- सूचीतील ४९ ते ७२ क्रमांकांचे उमेदवार
 • -कनिष्ठ अभियंता संवर्ग- सूचीतील १५१ ते २२५ क्रमांकांचे उमेदवार

दुसरे सत्र : दुपारी २ वाजता

 • -कार्यकारी अभियंता संवर्ग- सूचीतील ३१ ते ४० क्रमांकांचे उमेदवार
 • -उपअभियंता संवर्ग- सूचीतील ४२ ते ५४ क्रमांकांचे उमेदवार
 • -सहायक अभियंता संवर्ग- सूचीतील ७३ ते ९५ क्रमांकांचे उमेदवार
 • -कनिष्ठ अभियंता संवर्ग- सूचीतील २२६ ते २९७ क्रमांकांचे उमेदवार

भरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येणार असून संबंधित यशस्वी उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.