Categories: Featured कृषी

भाजप आणि मित्रपक्षांकडून राज्यव्यापी दूध बंद आंदोलन

मुंबई | दुधाला ३० रुपयांचा दर देऊन दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यावर मिळावं या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी आज राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची केलयं. राज्यात ठिकठिकाणी रस्ते, दुधाच्या गाड्या अडवून, दुधाचा अभिषेक करून, दूधाचे टँकर रोखत हजारो लिटर दूध  रस्त्यावर सोडून सरकारविरोधात  घोषणा दिल्या  कोरोनामुळे संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला गायीच्या दुधाला ३० रुपयांचा दर द्यावा. तसेच  प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यावर मिळावे. दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्याची मागणी भाजप आणि मित्रपक्षांकडून यावेळी करण्यात आली.

आम्ही ३ वर्ष दुधाला अनुदान दिल होत, आंदोलन करणं आमचा अधिकार – चंद्रकांत पाटील 
उद्धवजींचं ठीक आहे त्यांना शेतीविषयी कळायला वेळ लागणार आहे पण अजित पवार तर शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेत. त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. पॉली हाऊसच नुकसान झालं आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती असताना हि विद्यमान सरकारने मराठवाड्यात पीक विमा काढला नाही. सोयाबीनच बियाणं फेक आलं. अशा प्रश्नाच्या रांगा लागल्या असताना महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला  या काळात मोठा फटका बसला असून अजूनही दुधाला योग्य भाव मिळत नाहीये. भाजप सरकार असताना सलग ३ वर्ष दुधाला अनुदान दिल होत. त्यामुळ या सरकारने  गायीच्या दुधाला ३० रुपयांचा दर, दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यावर, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान न दिल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. 

दूध आमच्या घामच नाही कुणाच्या बापाचं – 
महायुतीच्या आंदोलनाची सुरवात काल रात्री सांगली जिल्ह्यातून झाली. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध आमच्या घामच नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत वाहतूक रोखून दूध रस्त्यावर ओतून दिले. तसेच येथे दुधाचा एक टँकर फोडण्यात आला. कराड सोलापूर मार्गावरील दिघंची गावाजवळ जर्सी गाय  रस्त्यावर उभी करून आंदोलन करण्यात आले. तर पंढरपुरात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत संत नामदेव पायरीजवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालत आंदोलनाची सुरवात केली.

Snehal Shankar

Journalist