Categories: राजकीय सामाजिक

‘यासाठी’ मंत्री मुश्रीफ यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट..!

अहमदनगर | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगनसिद्धी येथे भेट घेतली. ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयांवर यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. दुपारी तीन ते चार या वेळेत तासभर ही बैठक सुरू होती.

आठवडाभरापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या नवीन कायदा करण्यात आलाय. त्यासंदर्भात दोनच दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खाजगी व्यक्तींच्या नियुक्तीबाबत नापसंती व्यक्त केली होती. यासंदर्भात मंत्री मुश्रीफ यांनी पत्र लिहून अण्णा हजारे यांना लवकरच आपली भेट घेऊन सविस्तर चर्चा करू, असे पत्र लिहिले होते.

त्यानुसार अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीत अण्णा हजारे यांनी महात्मा गांधीजी यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग, जमीन, पर्यावरण या साधन संपत्तीवरच आपण गावे समृद्ध करू शकतो, असे सांगितले. या भेटीत अण्णा हजारे यांनी मंत्री मुश्रीफ यांना ग्रामविकास, गावाच्या विकासात लोकसहभाग, ग्रामसभेचे अधिकार, समृद्ध गावे या विषयांवरील पुस्तके भेट दिली आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: हसन मुश्रीफ