Categories: राजकीय

मंत्री मुश्रीफांची देवेंद्र फडणवीसांवर टीका; म्हणाले… ‘हे’ तर दुर्दैवी!

अहमदनगर | ज्यांनी पाच वर्षे राज्याचे गृहमंत्री पद सांभाळले त्यांचाच राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही. यासारखे दुर्दैव नाही अशा शब्दात  राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागलीय. 

भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ५ वर्षे राज्याचं गृहखाते सांभाळले. त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात स्वतःच्या राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही. हे दुर्दैवी आहे, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. यावेळी मुश्रीफ यांनी अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला. अहमदनगर येथे हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झेंडा वंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

Team Lokshahi News