Categories: राजकीय

चंद्रकांत पाटलांसाठी मंत्री मुश्रीफांनी केली ‘विशेष’ प्रार्थना

कोल्हापूर। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देवानं सावरण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर ही खोचक भाषेत टीका केली असून पाटलांना सत्ता गेल्याचा ‘झटका’ बसल्याचे म्हणटले आहे.

भाजपच्या काळात मंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा हसन मुश्रीफ यांना राजकारणात त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. यावर मला फारसे काही बोलायचे नसल्याचे सांगत मुश्रीफ यांनी आमचे तीन पक्षांचे सरकार असले तरी भक्कम चाकांवर चालून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. 

चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील तसेच महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युतर देताना मंत्री मुश्रीफ यांनी ही विशेष प्रार्थना केला आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Chandrkantdada patil Hasan Mushrif satej patil कोल्हापूर चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी सतेज पाटील हसन मुश्रीफ