Categories: कृषी राजकीय

मंत्रीपदाची शपथ घेताच बच्चू कडूंची शेतकऱ्यांसाठी सरकारकडे मोठी मागणी..!

मुंबई|३० डिसेंबर|राज्यमंत्री पदाची शपथ घेताच शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यासाठी मोठी मागणी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाखांच्या मर्यादेत कर्जमुक्ती जाहीर केल्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढवायला हवी व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बच्चू कडू पुढे म्हणालेत की, “मला वाटतं सत्तर टक्के लोकांसाठी सरसकट कर्जमाफी होणार आहे. माझं मत आहे की २००७ ते २०१० तसेच त्याच्या अगोदरचा कर्जबाजारी असेल तर त्यालाही यामध्ये घेतला पाहिजे. जे विविध योजनांच्या घोषणातून सुटले असतील त्यांना कसं कव्हर करता येईल हे शोधणं गरजेचे आहे. जे दोन लाखाच्या वर आहेत त्याला सुद्धा कर्जमाफीत कसा आणता येईल हे पाहायला हवं.”

“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. दोन लाखाचे कर्ज माफी पूर्ण झाल्यावर मग पुढचा कार्यक्रम समोर येईल.” असेही कडू यांनी यावेळी स्पष्ट केलय.

Team Lokshahi News