Categories: कृषी

पीएम किसान योजनेतील ११ कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मोदी सरकारने पाठवला खास संदेश

 नवी दिल्ली | पीएम किसान योजनेतील जवळपास ११ कोटी शेतकऱ्यांना मोदी सरकारने खास संदेश पाठवला असून यामध्ये सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या कृषिविधेयकांबाबत माहिती देण्यात आली आहे. कृषी विधेयकावरून झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पीएम किसान योजनेतील नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवत शेतकऱ्यांचा कृषि विधेयकाला असणारा विरोध कमी करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केल्याचे सांगण्यात येत आहे.  

पीएम किसान योजनेच्या संपूर्ण माहिती आणि ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा – PM Kisan

हा संदेश किमान हमी भावाशी (एमएसपी) संबंधित आहे. या संदेशामध्ये रब्बी हंगाम २०२०-२१ साठी जाहीर केलेल्या एमएसपीची संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, यापूर्वी उत्पादनांची किंमत काय होती आणि आता किती केली आहे. कृषी मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणण्यानुसार, सरकारने थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेश पाठविल्याने बहुधा शेतकरी मृदू होतील आणि विरोधकांनी प्रयत्न करूनही पंतप्रधान मोदींची प्रतिमा शेतकरीविरोधी होऊ शकणार नाही.

खरं तर, यावेळी काही विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना शेती कायद्यामुळे शेतकऱ्यांना एमएसपी मिळू शकणार नाही असे म्हणत आहेत. यावर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने २५ सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, देशात सुमारे ११ कोटी शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे सरकारला या शेतकर्‍यांना कोणताही संदेश पाठवणे खूपच सोपे झाले आहे.

  • शेतकर्‍यांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे की सरकारने रब्बी २०२०-२१ साठी एमएसपी जाहीर केला आहे.
    • गव्हाची आधारभूत दर ५० रुपयांनी वाढवून १९७५ केला, हरभरा २२५ रुपयांनी वाढवून ५१०० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. खर्चाच्या अनुषंगाने गव्हाचे दर सर्वाधिक १०६ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत.
    • आधारभूत किंमती वाढवताना, भाडे, मानवी कामगार, बैल कामगार किंवा मशीन कामगार, भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या सामुग्रीचे भाडे, बियाणे, खते, सिंचन खर्च, उपकरणे व शेतातील इमारतींचा घसारा, कार्यरत भांडवलावरील व्याज, चालू पंप संचासाठी डिझेल, वीज भाडे तसेच कौटुंबिक श्रमांचे मूल्य यांचा समावेश आहे.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 24000 rupees pm kisan 6000 RUPEES PM KISAN SAMMAN YOJANA agriculture bills buy insurance Farmer loan get insurance Insurance Kisan credit card KISAN SAMMAN YOJANA Minimum support price MSP online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM kisan penssion scheme PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान क्रेडीट कार्ड किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान मानधन योजना पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना