Categories: Featuredकृषी

मोदी सरकारची ‘ही’ योजना शेतकरी उत्पादक संघटनेसाठी देणार १५ लाख रुपये

नवी दिल्ली। अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister of India) यांनी आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसाठी ११ घोषणा केल्यात. यामध्ये पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपयांच्या घोषणेचाही समावेश आहे. यात एफपीओ (FPO-Farmer Producers Organisation) साठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

काय आहे मोदी सरकारची योजना

मोदी सरकारने १० हजार शेतकरी उत्पादक संघटना बनविण्याची सुरुवात केली आहे. (FPO- Farmer Producer Organisation)  जे शेतकरी फक्त उत्पादक होते ते आता एफपीओच्या माध्यमातून कृषीशी संबंधित व्यवसाय करु शकणार आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांच्या मते या योजनेमुळे ३० लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. एफपीओ (Farmer Producer Organisation) शी जुडलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य दर मिळेल. देशातील १०० जिल्ह्यातील प्रत्येत तालुक्यात कमीत कमी एका एफपीओची स्थापना केली जाईल.

शेतकरी उत्पादक संघटनांना २ कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा या योजनेूतन देण्यात येणार आहे. या कर्जासाठी सरकार क्रेडिट गॅरंटी देणार आहे. प्रत्येक संघटनांना  १५ लाख रुपये भांडवल इक्किटी दिली जाणार आहे. या योजनेत २०२४ पर्यंत १० हजार शेतकरी उत्पादक संघटना बनवल्या जातील, यासाठी ६८६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही चौधरी म्हणाले.

कशी बनवणार उत्पादक संघटना

साधरण ११ शेतकऱ्यांचा एक ग्रुप असावा. या ग्रुपला काही तरी कंपनी नाव द्यावे. मोदी सरकार जे १५ लाख रुपये देणार आहेत, ते तुम्ही तयार केलेल्या कंपनीचे काम पाहून तीन वर्षात देण्यात येतील. संघटनेची काम पाहून नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस रेटिंग देईल. त्याच्या आधारावर मंजुरी मिळेल. मैदानी परिसरात एका संघटनेत म्हणजे डोंगराळ भागात नसलेले शेतकरी. यांच्या ग्रुपमध्ये साधारण ३०० जण असावेत  तर डोंगराळ भागात १०० शेतकऱ्यांचा ग्रुप असावा. जर आपल्याला एफपीओ बनवायचे असेल तर आपण खाली दिलेल्या कार्यालयांशी संपर्क साधावा. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (National Bank for Agriculture and Rural Development), लघु कृषक कृषी व्यापार संघ (Small Farmers’ Agri-Business Consortium), आणि राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC).

This post was last modified on May 27, 2020 8:03 PM

Rajendra Hankare

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020