Categories: कृषी

लॉकडाऊन काळात फक्त एका फोन कॉलवर सुटणार शेतकऱ्यांची समस्या, मोदी सरकारचा निर्णय, हा घ्या नंबर..!

नवी दिल्ली। लॉकडाऊनमुळे शेतीचे कामे खोळंबण्याची चिंता शेतकरी वर्गाला लागलेली आहे. त्यामुळे मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निणर्य घेतला आहे. पिकांची कापणी आणि पेरणी वेळेवर व्हावी आणि शेतकऱ्यांना शेतविषयक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने लॉकडाऊनच्या परिस्थितीत किसान कॉल सेंटर शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहे. यासाठी सरकारने कॉल सेंटरच्या नंबरला कृषी शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक मोबाईलवर डायव्हर्ट केले आहे. जेणेकरुन कृषिशास्त्रज्ञ त्यांच्या घरी बसून शेतकऱ्यांना मोफत सल्ला देऊ शकतील. 

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या साधारण २० हजार शेतकरी शेतीसाठी फोन करुन वैज्ञानिकांचा सल्ला घेत आहेत. देशात २१ किसान कॉल सेंटरच्या माध्यमातून हे काम चालत असून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शेतकरी कॉल करुन आपल्या शेतीशी संबंधित समस्यांचे निराकरण करून घेवू शकतात. यासाठी फार्म टेली अडवायझर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देईल. शेतकऱ्यांना यासाठी लँडलाईन किंवा मोबाईलद्वारे १८००१८०१५५१ वर कॉल करावा लागणार आहे.

सध्या सुमारे १२५ कृषी तज्ञ किसान कॉल सेंटरमध्ये कॉल रिसिव्ह करून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करतात. हे तज्ञ फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, रेशीम पालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय, बायोटेक्नॉलॉजी, गृह विज्ञान शाखेत पीजी किंवा डॉक्टरेट आहेत. जर शेतकऱ्यांनी किसान कॉल सेंटरमध्ये आपली समस्या घेऊन कॉल केला, पण कॉलला उत्तर मिळालं नाही तर अशा शेतकऱ्यांना सेंटरमधून परत कॉलबॅक केला जातो. किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मजकूर संदेश किंवा व्हाईस मेसेजेसही पाठविले जातात.  

मोबाईलवर माहिती मिळविण्यासाठी नोंदणी  – शेतकरी ५१९६९ किंवा ७७८२९९८९९ वर एसएमएस पाठवून नोंदणी करु शकतात. किसान GOV REG < नाव > , < राज्याचे नाव >,  < जिल्ह्याचे नाव >,  < ब्लॉकचे नाव > , असा संदेश  वरती दिलेल्या नंबरवर पाठवू शकता.  इंटरनेट जाणकारांसाठी  – http://mkisan.gov.in/hindi/wbreg.aspx या संकेतस्थळावर आपण नोंदणी करू शकता.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर किसान कॉल सेंटर कब बनाया गया किसान कॉल सेंटर की शुरुआत कब हुई किसान कॉल सेंटर की स्थापना कब हुआ किसान कॉल सेंटर नंबर किसान कॉल सेंटर भोपाल किसान कॉल सेंटर मोबाइल नंबर किसान कॉल सेंटर योजना किसान कॉल सेंटर विकिपीडिया किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर