Categories: कृषी

शेतकरी बंधूनो ‘या’ शेतीसाठी मोदी सरकार देतयं ५० हजारांची आर्थिक मदत आणि विविध लाभ

नवी दिल्ली। भारत सरकार रसायनमुक्त शेतीसाठी सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे. त्याच उद्देशाने शेतकऱ्यांनी शेतीत जैव कीटकनाशकांचा उपयोग करावा यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विश्वास व्यक्त करत सेंद्रिय शेतीचाही उल्लेख केला होता. आता या मार्गावर सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांना रासायनिक खतांऐवजी जैव खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.

पांरपारिक कृषी विकास योजनेतून प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत ३ वर्षाच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. ज्यात डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३१ हजार रुपये (६२ टक्के) दिले जातील. ही मदत सेंद्रिय खते, सेंद्रिय कीटकनाशके, गांडूळ खत, वनस्पती अर्क, उत्पादन किंवा खरेदी, यासाठी दिली जात आहेत.

पूर्वोत्तर क्षेत्र सेंद्रीय मुल्य श्रुंखला विकास मिशनच्या द्वारे २६ हजार रुपयांची मदत दिली जात आहे. एमओवीसीडी एनईआरच्या अंतर्गत सेंद्रीय साहित्य, बिया, रोपे, लागवडीच्या साहित्यासाठी ३ वर्षासाठी प्रति हेक्टरकरीता २५ हजार रुपयांची मदत केली जात आहे.

भांडवली गुंतवणूक अनुदान योजनेद्वारे भारत सरकार वर्षाला २०० टन क्षमता असलेले जैव खतांसाठी सरकारी संस्थांना १६० लाख रुपये प्रति युनिट सीमेच्या आधारावर १०० टक्के सहाय्यता उपलब्ध करु देणार आहे. याप्रकारे खासगी संस्थेच्या गुंतवणुकीच्या रुपात ४० लाख रुपये प्रति युनिट सीमेच्या आधारावर २५ टक्क्यांपर्यंत सहाय्यता उपलब्धता करुन दिली जाणार आहे. ही मदत राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बॅक नाबार्डच्या माध्यमातून उपलब्ध केली जात आहे.

पांरपारिक कृषी विकास योजनेच्या अंतर्गत मागील तीन वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.  २०१६-१७ साठी १५२.८२ कोटी रुपये, २०१७-१८ साठी २०३.४६ कोटी रुपये, २०१८-१९ साठी ३२९.४६ कोटी रुपये, आणि चालू वर्ष २०१९-२० साठी २२६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.  एमओवीसीडीएनईआर च्या अंतर्गत २०१६-१७ साठी ४७.६३ कोटी रुपये, २०१७-१८ साठी ६६.२२ कोटी रुपये, २०१८-१९ साठी १७४ कोटी रुपये आणि ७८.८३ कोटी रुपये २०१९-२० या चालू वर्षासाठी खर्च करण्यात आले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Bio pesticide narndra sing Tomar agri minister Nirmala Sitaraman union ministry for agriculture जैविक किटकनाशके जैविक शेती रसायनमुक्त शेती सेंद्रिय शेती