नवी दिल्ली | वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी काऊंसिलच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील अनेक निर्णयांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बैठकीत अनेक वस्तूंवरील कर कमी केले आहेत.
मोदी सरकारने दैनंदिन जिवनातील अनेक गोष्टी स्वस्त केल्यामुळे याचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे. यात तेल, टूथपेस्ट, साबण यासह वॉशिंग मशिन, एलपीजी स्टोव्ह, एलईडी, शाळेची बॅग, हेल्मेट, सीसीटीव्ही यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. याबरोबरच दुध पावडर, लस्सी, मध, गहू, तांदूळ, पाम तेल, सनफ्लॉवर ऑईल, अन्य तेले, साखर आदींचाही समावेश आहे.
कोरोना संकटामुळे अनेकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यात दुध पावडर, लस्सी, मध, गहू, तांदूळ, पाम तेल, सनफॉवर ऑइल, अन्य तेल, साखर आदींचा समावेश आहे.