Categories: बातम्या सामाजिक

मोदी सरकारची 330 रूपयांची ‘ही’ योजना देईल कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबास आर्थिक आधार

कोल्हापूर | सध्या सर्वत्र कोरोना संसर्गामुळे रुग्णांचे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. या संसर्गजन्य रोगाची लागण होऊन एखादी व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक दृष्ट्या मोठा धक्का बसू शकतो. या काळात असे  संकट कुठल्याही कुटुंबावर येऊ नये अशी सर्वांची दृढ भावना आहे. परंतू  जर अशी वेळ कोणावर आलीच तर त्या कुटुंबास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आर्थिक मदतीचा आधार ठरू शकते.

२०१५ साली केंद्र सरकारने सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या बचत खातेदारांना स्वस्त विमा योजना चालू केली आहे. यामध्ये पंतप्रधान जीवन ज्योतीविमा योजनेअंतर्गत विमाधारकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास २ लाख रुपये विमाधारकाने सुचवलेल्या व्यक्तीस (वारसास) मिळू शकतात. आपण जर या योजनेपासून वंचित असाल तर आपल्या नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन आपल्या बचत खात्यामार्फत या योजनेमध्ये सामील होऊ शकता. 
(अर्जाचा नमुना येथे Click करून पहा)

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजने मध्ये वय वर्षे १८ ते ५० वर्ष असणाऱ्या व्यक्तींनाच सहभागी होता येईल. बचत खात्यामधून ३३० रुपयाचा विमा हप्ता भरावा लागेल. विमा हप्ता भरल्यानंतर ४५ दिवसानंतर हा विमा लागू होईल. या विम्या अंतर्गत त्या विमाधारकाचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास (अपघाती मृत्यू सोडून) त्याच्या वारसदारांना २ लाख रुपये मिळू शकतात. केंद्र सरकारची ही योजना देशातील कुटुंबांना मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.

Team Lokshahi News