Categories: Featured

अट एकच… त्यांची आई, बहीण सोबत हवीच.. मोहिते पाटील-चाकणकर वादाला वेगळे वळण!

पुणे।२९ डिसेंबर।माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहमोहिते पाटील आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या वादात आता मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी उडी घेतलीय. त्यांनी रूपाली चाकणकर यांना समर्थन देत मोहिते पाटलांना आव्हान दिलयं. 

पुणे येथील एका कार्यक्रमात मी राष्ट्रवादीतच म्हणणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जोरदार टिका केली होती. ‘जिकडे भेळ तिकडे मोहिते पाटलांचा खेळ’ अशा शब्दात चाकणकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. चाकणकरांनी केलेली टीका मोहिते समर्थकांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने त्यांनी प्रत्युतरादाखल, “रुपालीताई, आपणास सन्मानपूर्वक आग्रहाचं निमंत्रण.. अकलूजच्या लावणी महोत्सवाचा कार्यक्रम बघण्यासाठी व प्रसिद्ध भेळ खाण्यासाठी..!! फेसबुक पोस्ट करण्यात आली होती. 

मोहिते पाटील यांच्या समर्थकांच्या या पोस्टवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांना मोहिते पाटलांचे निमंत्रण स्विकारण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात रूपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट केलीय… यामध्ये त्यांनी…. आमची मैत्रीण रूपाली ताई चाकणकर तुम्ही आमंत्रण स्वीकारले पाहिजे ,
अट एकच ठेवा ज्यांनी निमंत्रण दिले त्यांची आई, बहीण सोबत हवीच.. म्हणजे कसे लावणीला रंगत येईल, भेळी सकट, स्वीकाराच आमंत्रण, स्त्री शक्ती सुद्धा कमी नाही हो. आम्ही पण येऊ की मनसे लावणी पाहायला. असे मत व्यक्त केलयं.  आता यावर रूपाली चाकणकर आणि मोहिते समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: मोहिते पाटील-चाकणकर राष्ट्रवादी महिला आघाडी रूपाली पाटील ठोंबरे विजयसिंह मोहिते पाटील