‘या’ IT कंपन्यांमध्ये मिळणार 1 लाखांहून अधिक उमेदवारांना नोकरी

मुंबई | जर तुम्ही IT कंपन्यांमध्ये नोकरीची संधी शोधत असाल तर यावर्षी ती संधी नक्कीच मिळणार आहे. चांगल्या तंत्रज्ञानाच्या टॅलेंटला विकत घेण्यासाठी देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो आणि कॉग्निझंट एकत्रितपणे या आर्थिक वर्षात 1 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याची अपेक्षा आहे.

आयटी क्षेत्रातील मेजर प्लेयर्स असलेल्या टीसीएस (TCS), विप्रो (Wipro) आणि इन्फोसिसनं (Infosys) अलीकडेच आपापल्या तिसर्‍या तिमाहीचे रिझल्टस जाहीर केले. या तिन्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे. गेल्यावर्षी (2021) या कंपन्यांनी विक्रमी 1.7 लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या होत्या. हीच नियुक्ती मोहीम (hiring drive) 2022 या फायनान्शियल इयरमध्येही सुरू राहणार असल्याचं या आयटी दिग्गजांनी जाहीर केलं आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) बुधवारी आपले तिमाहीचे रिझल्ट्स जाहीर केले आहेत. 2022मध्ये टीसीएस आपली कर्मचारीभरती मोहीम सुरुच ठेवणार आहे. मात्र, वर्षभरात कंपन्या किती नोकऱ्या देणार आहे याबाबतची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. ‘आमची कर्मचारी भरती आहे त्याचं स्पीडनं सुरू राहील. पण, येत्या तिमाहीत किती नियुक्ती केली जाईल याची विशिष्ट आकडेवारी आम्ही सध्या निश्चित केलेली नाही’, असं कंपनीचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर (chief human resources officer) मिलिंद लक्कड (Milind Lakkad) यांनी मीडियाला सांगितलं.

भारतातील दुसरी सर्वांत मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिसनं (Infosys) बुधवारी (12 जानेवारी) आपली येत्या आर्थिक वर्षातील कर्मचारी भरती योजना जाहीर केली आहे. येत्या आर्थिक वर्षात, ग्लोबल ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रामचा (global graduate hiring programme) भाग म्हणून 55 हजार पेक्षा जास्त फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार कंपनी करत आहे.

विप्रो 2023 या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 30 हजार फ्रेशर्सला नोकऱ्या देण्याच्या विचारात आहे. आयटी क्षेत्रातील सध्याची स्थिती पाहता भविष्यात आयटीला जास्त मागणी असणार आहे. मागणी वाढलेली असताना पुरवठ्यामध्ये अडथळे येऊ नये यासाठी पुरेशी कर्मचारी संख्या असणं आवश्यक आहे. त्यामुळं गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून 70 टक्क्यांहून अधिक फ्रेशर्सना ऑनबोर्ड (onboard ) घेण्याचा विचार कंपनी करत आहे. 2021-22 मध्ये विप्रोनं सुमारे 17 हजार 500 जणांना नोकरी दिली आहे. उर्वरित 2022 आणि 23 मध्ये आणखी 30 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार कंपनी करत आहे, अशी माहिती विप्रोचे प्रेसिडेंट (President) आणि सीएचआरओ सौरभ गोविल (Saurabh Govil) यांनी दिली आहे.

त्याचबरोबर Cognizant भारतात मोठ्या प्रमाणावर पदभरती करणार आहे. फ्रेशर्स (Freshers jobs in IT) आणि प्रोफेशनल्ससाठी (Professionals jobs in IT) ही भरती असणार आहे. कंपनीने 2021 मध्ये अंदाजे 30,000 नवीन पदवीधरांना (Graduates Jobs in IT) ऑनबोर्ड करण्याची आणि 2022 साठी भारतातील नवीन पदवीधरांना 45,000 ऑफर देण्याची घोषणा केली होती. कॉग्निझंटने (Jobs in Cognizant) या आर्थिक वर्षात सुमारे एक लाख लॅटरल कर्मचार्‍यांची भरती करण्याची घोषणाही केली होती. त्यानुसार आता कंपनीमध्ये जॉब्सच्या संधी (Jobs In IT Sector) उपलब्ध होणार आहेत.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)