Categories: Featured

राजू शेट्टींच्या कर्जमाफीवरील टिकेला खा. धैर्यशील माने यांचे ‘हे’ उत्तर

कोल्हापूर।२७ डिसेंबर। राजू शेट्टींची कर्जमाफीबद्दलची आकडेवारी शासनाची आकडेवारी नाही. त्यांनी सांगितलेली आकडेवारी कुठून आली माहिती नाही. मात्र, राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा फायदा कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना होईल हे नक्की, असे खासदार धैर्यशील माने म्हणाले.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारने केलेली कर्जमाफी केवळ ७ ते ८ हजार कोटींपर्यंतची असेल, असे म्हटले होते. त्यावर आज खासदार माने यांनी उत्तर दिले. सध्याचे राज्य शासन संवेदनशील शासन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील संवेदनशील आहेत. त्यामुळे सरकार स्थापन होताच कर्जमाफीसारखा सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्याप्रती असणारी त्यांची संवेदना या विनाअट कर्जमाफीच्या निर्णयानंतर दिसून येत असल्याचे खासदार माने म्हणालेत.

ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीवर विरोधकांसोबत राजू शेट्टी तसेच इतर शेतकरी नेत्यांनीही टिका केली होती.

Team Lokshahi News