नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखेंची नेटकऱ्यांकडून धुलाई, रोहित पवारांवरील टिकेने संतापले नेटकरी

Rohit-Pawar-Sujay-Vikhe-Patil

अहमदनगर।२ जून। रोहित पवारांची अवस्था पार्थ पवार याच्यापेक्षा वाईट करू असे आव्हान देणाऱ्या खा. सुजय विखे यांना नेटकऱ्यांनी चांगलच झापलय. एका यशाने इतके हुरळून जाऊ नका.. रोहित पवार स्वकर्तृत्वाने तयार झालेलं नेतृत्व आहे, सुजय तू मोदीलाटेवर निवडून आलाय… मोदींच्या सभेत तुझा झालेला तमाशा साऱ्या जगानं पाहिलाय… या आणि यासारख्या हजारो कमेंटनी नेटकऱ्यांनी सुजय विखेंवर चौफेर हल्ला चढवला. 

नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांचा कर्जत येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला टारगेट करत पार्थप्रमाणे रोहितची अवस्था वाईट करू असे विधान केले होते. राम शिंदे साहेब तुम्ही काही काळजी करू नका. कर्जत जामखेडची जबाबदारी माझ्यावर सोडा, पार्थचा जसा लाजिरवाणा पराभव केला त्याच्याहीपेक्षा रोहितची अवस्था वाईट करू. आजोबा बाळासाहेब विखेंसारखे गप्प बसून काम दाखवू, असे म्हणत खासदार सुजय विखे यांनी रोहित पवार यांना आव्हान दिले होते. 

सुजय विखेंच्या या वक्तव्याच्या बातम्या सोशल मिडियावरून व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सुजय विखे यांचा चांगलाच समाचार घेतला. काहींनी तर मी स्वतः भाजप समर्थक असून देखील सुजयपेक्षा रोहित पवारचे नेतृत्व सर्वोत्तम असल्याची कमेंट केली. एका नेटकऱ्याने तर रोहित पवार तुम्हाला कच्च खाऊन ढेकर पण देणार नाहीत, उगीच त्यांचा कशाला नाद करता असे मत व्यक्त केलय.. तर काहींनी, दुष्काळ पडलाय त्याचे काही तरी बघा.. निवडून आल्या आल्या जिरवाजिरवीची भाषा करू नका.. नाहीतर ज्या जनतेने डोक्यावर घेतलय.. तीच जनता पायाखाली घ्यायला वेळ लावत नसते हे विसरू नका यासारख्या कमेंट करत सुजय विखे यांच्या विरोधात संताप व्यक्त केलाय.

खासदार सुजय विखे यांनी केलेल्या या वक्तव्याने सोशल मिडीयावर चांगलीच राळ उडाली असून राष्ट्रवादी समर्थकांबरोबर भाजप समर्थकांनी देखील रोहित पवार यांचीच बाजू घेतल्याचे दिसून आलयं. एकीकडे सोशल मिडीयावरून सुजय यांना नेटकऱ्यांनी चोख उत्तर दिले असले तरी रोहित पवार यांनी मात्र सुजय विखे यांच्या या वक्तव्याला कोणतेही महत्व दिले नसल्याचे दिसून येतय.

By Lokshahi.News