Categories: Featuredकृषी

… अन् खासदार नवनीत राणा पेरणीसाठी थेट शेतकऱ्याच्या शिवारात – पाहा व्हीडीओ

अमरावती | यंदा मान्सूनचं आगमन अगदी वेळेवर झाल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे बळीराजाची पेरणीसाठी लगबग सुरू झालीय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पेरणीचा अनुभव घेतलाय.

दौऱ्यावर असताना त्यांनी शेतात पेरणी सुरू असल्याचं दिसताच ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली अन् थेट त्या शेतकऱ्याच्या वावरात जाऊन पेरणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याकडून पेरणीची माहिती घेतली. तसेच पेरणीचा अनुभव देखील घेतला.

संपूर्ण देश लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संकटातून जात आहे. अशा कठीण प्रसंगात बळीराजाने मात्र कुणालाही उपाशी न राहू देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे या बळीराजाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या प्रति चार शब्द आपुलकीचे बोलण्यासाठी मी शेतात आल्याचं नवनीत राणा यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी शेतात असलेल्या शेतकरी, शेतमजुराशी नवनीत राणा यांनी आपुलकीने संवाद साधला. त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच तुमच्या प्रश्नांसाठी मी नक्की काम करेन, असा शब्द देऊन त्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या.

This post was last modified on June 16, 2020 8:53 AM

Team Lokshahi News

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020