Categories: कला/संस्कृती पर्यटन राजकीय

यामुळे… साेशल मिडीयावर केलं जातयं खासदार डॉ. अमोल कोल्हेंच कौतुक..

  • संसदेतील पहिल्याच भाषणात तमाम महाराष्ट्रवासियांच्या अस्मितेचे मुद्दे मांडल्याने अमोल कोल्हेंवर कौतुकाचा वर्षाव.
  • अमोल कोल्हे यांनी, किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी लोकसभेत केली. जर स्टॅच्यू ऑफ युनीटीचा विचार होत असेल तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचाही विचार केला पाहिजे. रायगड किल्ल्याची शासनाने जपणूक करून राजधानी केल्यास ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल असेही अमोल कोल्हे यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हणटले. त्याचबरोबर गडसंवर्धनाची मागणी त्यांनी प्रकर्षाने मांडली.

नवी दिल्ली।२५ जून। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनानुसार संसदेतील पहिल्यात भाषणात बैलगाडा शर्यत, किल्ले रायगड, गड किल्ल्यांचे संवर्धन आणि शेतकरी आत्महत्या या महत्वाच्या मुद्दांवर लोकसभेत अभ्यासपूर्ण मांडणी केली, त्यांच्या या भाषणातील अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सोशल मिडीयावर  डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

बैलगाडा शर्यत ही तमाम महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाच्या अस्मितेची बाब, परंतु गेल्या काही वर्षापासून कथित प्राणीप्रेमींच्यामुळे बैलगाडा शर्यतींना खो बसला आहे. प्राणीप्रेमींच्या तक्रारीमुळे न्यायालयात ही बाब गेल्याने सरकारने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. 

खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात, बैलगाडा शर्यत ही केवळ मनोरंजन नसून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे मोठे माध्यम असल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडला. केवळ बैलगाडा मालकच नाहीत, तर ट्रान्सपोर्टपासून ते सर्वसामान्य लोक देखील या शर्यती पाहण्यासाठी जमा होतात.

गावागावातील जत्रा यात्रांच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाऊन गावांच्या अर्थकारणात मोठी उलाढाल होते. परंतु आता बैलगाडा शर्यतींना बंदी असल्याने ही सारी अर्थव्यवस्थाच कोलमडली असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आणि तात्काळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची जोरदार मागणी केली. 

यावेळी अमोल कोल्हे यांनी, किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणीही लोकसभेत केली. जर स्टॅच्यू ऑफ युनीटीचा विचार होत असेल तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचाही विचार केला पाहिजे. रायगड किल्ल्याची शासनाने जपणूक करून राजधानी केल्यास ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल असेही अमोल कोल्हे यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हणटले. त्याचबरोबर गडसंवर्धनाची मागणी त्यांनी प्रकर्षाने मांडली. 

त्याचबरोबर शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात मांडला. यावेळी त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा उल्लेख करत शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. 

एकूणच खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत मांडलेल्या शेतकरी आणि तमाम महाराष्ट्रवासियांच्या हिताच्या मुद्द्यांमुळे आज त्यांच्यावर सोशल मिडीयावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पहायला मिळत आहे. 

  • Lokshahi.News

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: Dr. amol kolhe Forts Raigad किल्ले रायगड