Categories: कला/संस्कृती मनोरंजन

खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पश्चिम बंगाल।२१ सप्टेंबर। दूर्गा पूजेचा सण पश्चिम बंगालमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूर्गा पूजेचे महापर्व सुरु होण्यापूर्वीच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.  या व्हिडीओमध्ये नुसरत आणि मिमी चक्रवर्ती दुर्गा पूजेनिमित्त तयार करण्यात आलेल्या एका गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

‘असे माँ दुर्गा शे’ असे या व्हीडीओतील गाण्याचे बोल असून यात बंगालमधील पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आला आहे.  नुसरत आणि मिमी यांच्यासह बंगालमधील लोकप्रिय अभिनेत्री सुभाश्री गांगुलीदेखील यामध्ये नृत्य सादर करताना दिसत आहे. 

हा पहा व्हीडीओ..

‘असे मॉं दूर्गा शे’ हे गाणे बंगालमधील दूर्गा पूजेसाठी खास तयार करण्यात आले आहे. हे गाणे टॉलिवूड संगीत दिग्दर्शक इंद्रदीप दास गुप्ताने तयार केले आहे. तसेच बाबा यादव यांनी नृत्य दिग्दर्शन केलं असून गाण्यात बंगालमधील लोकनृत्य छऊचंही सादरीकरण करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या दूर्गा पूजा उत्सवादरम्यान या गाण्याच्या माध्यमातून एक मोहीमेचं प्रमोश करण्यात येणार आहे.

व्हिडीओमध्ये या तिघींचा डान्स अप्रतिम आहे. दरम्यान तिघींनीही बंगाली पारंपरिक साड्या नेसल्या असून त्यावर सुंदर दागिने परिधान केले आहेत. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: असे मॉं दूर्गा शे खासदार नुसरत जहाँ मिमी चक्रवर्ती