Categories: सामाजिक

मुद्रा लोन हवंय पण मिळत नाही? मग ‘हे’ काम करा..!

नवी दिल्ली | देशातील बेरोजगारांना, तसेच छोट्या उद्योजकांना अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने ८ एप्रिल २०१५ रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरू केली. नॉन – कॉरपोरेट, नॉन – फार्म लघू आणि सुक्ष्म उद्योजकांना या योजनेमार्फत १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. सरकारने या योजनेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. असे असले तरी या योजनेच्या माध्यमातून कर्ज मागण्यासाठी जाणाऱ्या अनेकांच्या पदरी निराशा पडल्याचेही पहायला मिळाले आहे. त्यामुळे या योजनेवर बऱ्याच प्रमाणात टीका देखील केली जाते. 

दरम्यान, विविध बँका विविध योजना राबवून मुद्रा योजनेमार्फत लोकांना कर्ज पुरवठा करीत आहेत. भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआय तर अवघ्या ५९ मिनीटात १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत असल्याचे सांगितले जाते. या योजनेचे प्रामुख्याने तीन प्रकार असून शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण मुद्रा या प्रकारातून ग्राहकांना हे कर्ज दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीला आपला व्यवसाय सुरु करायाचा असेल किंवा स्टार्ट- अप उभारायचे असेल तर बँकेमार्फत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. किशोर मुद्रा लोन गटातून ५० हजारापासून ते ५ लाख रुपयांपर्यंचे कर्ज दिले जाते. यासाठी बँक  १४ ते १७ टक्के पर्यंतचे व्याज आकारते. तर तरुण मुद्रा लोन या गटातून १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. यासाठी बँक १६ टक्के व्याज आकारते. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही मुद्रा लोन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकता. 
https://www.mudra.org.in/ 

आपल्याला बँकेतून Mudra योजनेतून कर्ज मिळत नसेल तर ‘या’ टोल फ्री नंबरवर कॉल करुन तक्रार करा –
* नॅशनल :  1800 180 1111 आणि 1800 11 0001
* महाराष्ट्र :18001022636
* उत्तर प्रदेश : 18001027788
* उत्तराखंड : 18001804167
* बिहार : 18003456195
* छत्तीसगढ़ : 18002334358
* हरियाणा : 18001802222
* हिमाचल प्रदेश :18001802222
* झारखंड : 1800 3456 576
* राजस्थान : 18001806546
* मध्य प्रदेश : 18002334035

मुद्रा लोनसाठी लागणारी कागदपत्रे –
ओळखपत्र,  बँकचे स्टेटमेंट, फोटो, विक्रीचे कागदपत्र, प्राईस कोटेशन्स बिजनेस आयडी, आणि रहिवाशी दाखला,जीएसटी आइडेंटिफिकेशन नंबर, इनकम टॅक्स रिटर्नची माहितीही आपल्याला कागदपत्रासह द्यावी लागेल.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: mudra loan interest rate mudra loan online apply mudra loan registration mudra loan scheme mudra loan subsidy pm mudra loan pradhan mantri mudra loan sbi mudra loan एसबीआय मुद्रा कर्ज दुपारी मुद्रा कर्ज प्रधान मंत्री मुद्रा कर्ज मुद्रा कर्ज अनुदान मुद्रा कर्ज ऑनलाइन अर्ज मुद्रा कर्ज नोंदणी मुद्रा कर्ज योजना मुद्रा कर्ज व्याज दर