मुंबई | गणरायाचे आज मोठ्या भक्तीभावाने सगळीकडे आगमन झाले आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना त्यांच्या बाप्पाच्या डेकोरेशनसाठी फुले, साहित्य, तोरणे मिळालेली नाहीत. त्यामुळे या व्यक्तींनी वेगवेगळ्या कल्पना लढवून बाप्पाचे स्वागत केले आहे. बाप्पाचे असेच स्वागत मुळशी पॅटर्न फेम अभिनेता आणि दिग्दर्शक (Pravin Tarde) यानेही केले. मात्र, यावरून तरडेना सोशल मीडियावर कमालीचे ट्रोल व्हावे लागले. आपली चूक ध्यानात येताच तरडेनी आपला माफीनामा देत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रविण तरडेनी गणपतीची प्रतिष्ठापना भारतीय संविधानवर करत संविधानाचा अपमान केला. या सजावटीसाठी तरडेनी पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली. त्याची कल्पना चांगली असली तरी गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले. या पुस्तकांच्या मनोऱ्यांवर विठ्ठल, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, श्रीकृष्णाची मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी मात्र त्यानी जाणुनबुजून भारतीय संविधानाचा वापर केला आहे. मात्र, त्याची ही कल्पना नेटकऱ्यांना आवडलेली नसल्याने त्याला ट्रोल व्हावे लागले आहे.
एका फेसबुक युजरने तरडेंना केसांची वाढ झाल्याने मेंदूची वाढ खुंटली असेल, अशी खोचक टीका केली आहे. तसेच गणपती बाप्पा प्रवीण तरडेंना सुबुध्दी दे असे आवाहन केले आहे. देशाच्या संविधानाचा अपमान केल्यावरून तरडे ट्रोल झाले आहेत. तरडेंनी मुद्दामहून असा खोडसाळपणा केला असल्याचे आरोप होत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.