Categories: Featured आरोग्य सामाजिक

मुंबईत डीसीपी रँकच्या पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे, १२ पोलिसांनाही केलं क्वारंटाईन

मुंबई। मुंबईत एका पोलीस उपायुक्त अर्थात डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अधिकाऱ्याच्या घशातील स्त्रावाचे स्वॅब चाचणीकरिता पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे. या रिपोर्टची प्रतीक्षा सर्वांना आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील १२ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. मुंबईतील अनेक दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर, आता डॉक्टर आणि काही पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि पोलीसच समाजरक्षणासाठी  कर्तव्य बजावत असताना, त्यांनाही आता कोरोनाची लागण होत असल्याने, परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे दिसू लागले आहे. 

दरम्यान, डीसीपी रँकच्या या अधिकाऱ्याला काल रुग्णालयात दाखल केल्यानंतर, काही प्राथमिक चाचण्या केल्या. त्यावेळी त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने, घशाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. खबरदारी म्हणून या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील १२ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांना पुढील १४ दिवस आहे त्याच ठिकाणी म्हणजे, डीसीपी कार्यालयातच राहावं लागणार आहे. कोरोना संशयित पोलिस अधिकारी अॅडिशनल कमिशनर कार्यालयातही एक-दोनवेळा गेल्याने, ते कार्यालयही सील करण्यात आलं आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corona update mumbai