Categories: गुन्हे

भोगावती – कुरूकली येथे तरूणाचा निर्घून खून

भोगावती | शेतात म्हैशी जाऊन नुकसान झाल्याचे रागातून आज कुरूकली येथे एका तरूणाचा धारदार हत्याराने निर्घून खून करण्यात आलाय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काशिनाथ साताप्पा पाटील (वय ३०) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. संशयित किरण हिंदूराव पाटील याने खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गणेश चतुर्थीच्या दिवशी काशिनाथ याच्या कुटूंबातील जनावरे चुकून किरण याच्या शेतात गेली होती, त्यावेळी त्यांनी त्यांचे हत्ती गवत खाल्ले होते. त्यामुळे कुटूंबात वाद झाला होता. यावेळी झालेल्या भांडणावेळी मृत काशिनाथ याने किरणची गळपट्टी धरल्याचे समजते. त्याचा राग मनात धरून किरणने काशिनाथचा खून केल्याची माहिती मिळत आहे. 

सकाळी पावणेदहाच्या दरम्यान हा खूऩ झाला असून कुरूकली कॉलेज रोडवरील रिकवे स्टॉपवर ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: murder