Categories: गुन्हे बातम्या

तळसंदे येथे किरकोळ कारणावरून तरूणाचा खून, परिसरात खळबळ

कोल्हापूर | हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील युवकाचा किरकोळ कारणावरून खून झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे. अविनाश कांबळे (वय ३५) असे मयत झालेल्या युवकाचे नाव असून त्याचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तळसंदे येथील भगवान सहदेव कांबळे आणि शिवाजी रामा कांबळे या चुलत भावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जमीन आणि घराशेजारील कुंपणावरून वाद सुरू होता. याच वादातून आज सकाळी (गुरूवार, १ ऑक्टोबर) दोन्ही कुटूंबात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने याचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी झालेल्या मारहाणीत अविनाश याचा मृत्यु झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आईवडील असा परिवार आहे. पेठवडगाव पोलिसात याबाबतचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. 

Team Lokshahi News