Categories: कृषी

शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी नाबार्डकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी मिळणार..!

नवी दिल्ली | नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात (नाबार्ड) ने खरीप शेतीसाठी देशभरातील शेतकऱ्यांना रोख रकमेची व्यवस्था करण्यासाठी ५००० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. अंफान चक्री वादळामुळे पश्चिम बंगालमधील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नाबार्डने बंगालला १०७० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. ५००० कोटींची ही रक्काम सहकारी बँका, ग्रामीण बँका, मायक्रो फायनान्स संस्था आणि एनबीएफसीद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात वितरित केली जाईल.

खरीप हंगामासाठी नाबार्डने नुकताच २७६ कोटी वितरित केला आहे. पश्चिम बंगालमधील नाबार्डचे मुख्य जनरल मॅनेजर सुब्रता मंडल यांनी बँकेला ३९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिलीय. ते म्हणाले की लॉकडाऊनमुळे ६ महिने कर्जदारांकडून हप्ते वसूल करण्यास सरकारने बंदी घातली आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. खरीप हंगामात शेतीसाठी रोख रकमेच्या पूर्ततेसाठी ५००० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम विविध वित्तीय संस्थांद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना कर्ज म्हणून वितरित केली जाईल.

पश्चिम बंगालमधील शेतीच्या मोठ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्याला अतिरिक्त १०७० कोटी रुपये देण्यात आले आहेत. यातील रक्कम राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी वापरली जाणार आहे. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना व्याजातून विशेष सूट मिळेल. देशभरातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट साठी २ लाख करोड रुपये खर्च केले जातील. याचा फायदा देशभरातील अडीच कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

This post was last modified on July 18, 2020 3:00 PM

Team Lokshahi News

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020