Categories: प्रशासकीय

तुकाराम मुंढेनी काढलेलं कार्यालयीन शिस्त पालनाचं ‘हे’ पत्रक वाचून कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी…

नागपूर कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक चुकीच्या बाबी मार्गावर आणण्याचा विडा उचलला असताना, महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही वळण लावण्याचा प्रयत्न तुकाराम मुंढे यांनी सुरू केला आहे. (Tukaram Mundhe Rules)

यासाठी मुंढे यांनी कार्यालयीन शिस्त पालनांच एक पत्रकच काढलं असून अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्यास प्रशासकीय कार्यवाही केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

तुकाराम मुंढेंनी जारी केलेल्या परिपत्रकातील ठळक बाबी

  • 1. मंजुरीशिवाय सुट्टी घेतली, तर पगार कापला जाणार
  • 2. तीन दिवस उशीर झाल्यास (लेटमार्क) एका दिवसाची सुट्टी कमी करण्यात येईल
  • 3. कार्यालयीतील भिंतींवर कुठलाही कागद, परिपत्रक दिसल्यास कारवाई
  • 4. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर बंधनकारक
  • 5. अधिकारी, कर्मचाऱ्यांना विभागप्रमुखांकडेच आवश्‍यक बाबींची मागणी करावी लागेल
  • 6. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्यास प्रशासकीय कार्यवाही

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नावाचाच एवढा दरारा आहे, की त्यांच्या बदलीची ऑर्डर निघाली आणि ते रुजू होण्यापूर्वीच नागपूर मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी वेळेत कार्यालयात यायला लागले. गेल्या मंगळवारपासून मुंढे रुजू झाल्यानंतर तर अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धडकीच भरली. कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला होता. कामात अनियमितता आढळल्याने लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश, तुकाराम मुंढे यांनी दिले होते. पहिल्याच बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत काम न करणाऱ्यांना घरी जावं लागेल, असा इशारा दिला.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corporation news NMC Commissioner Tukaram Mundhe Tukaram Mundhe तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिका