Categories: Featured आरोग्य सामाजिक

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटर आणि फेसबुकद्वारे ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

“माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी विनंती करतो की, मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपण नक्कीच जिंकू,” असं तुकाराम मुंढे यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

Team Lokshahi News